राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत शासन निर्णय (GR)

7th Pay Commission Arrears : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत.

दिनांक 30 जानेवारी, 2019 अन्वये 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात, 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन परिपत्रक वित्त विभाग, दिनांक 20 फेब्रुवारी, 2019 अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात, 5 समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक 30 मे, 2019 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

राज्यात कोविड – 19 (कोरोना) या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक 09 मे, 2022 अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 1 जुलै, 2021 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान दिनांक 09 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. तसेच या शासन निर्णयामध्ये उर्वरीत देय असलेल्या हप्त्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2022 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या 4 थ्या हप्त्यांची रक्कम भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात अथवा रोखीने अदा करण्यात आलेली आहे.

आणखी राज्य शासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या 5 व्या हप्त्याची रक्कम प्रदान करणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात, 5 समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक 30 मे, 2019 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

त्याच प्रमाणे राज्य शासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या 5 व्या हप्त्याची थकबाकीची रक्कम प्रदान करणे बाबत अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

असे वृत्त आहे की, राज्य शासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या 5 व्या हप्त्याची थकबाकीची रक्कम माहे जून च्या वेतना सोबत अदा केली जाऊ शकते.

शासन निर्णय

Leave a Comment