7th pay commission : 7 व्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

7th pay commission : 7 व्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ मिळण्याकरिता दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

दिनांक 01 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे, त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत होणाऱ्या मूळ निवृत्तिवेतनावर सुधारीत अंशराशीकरणाचा लाभ देय करण्यातबाबत सदरील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासकीय पूरकपत्र

दि.01.01.2016 ते दि.31.12.2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्तिवेतनधारकांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 नुसार सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्तिवेतनाप्रमाणे अंशराशीकरणाचा लाभ घेतला आहे, तथापि, संदर्भाधीन क्र.1 येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यु झाला आहे, अशा निवृत्तिवेतनधारकांच्या कुटुंबियांना सुधारित निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ अनुज्ञेय राहील.

ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील पूरकपत्र योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.

शासन निर्णय पहा

Leave a Comment