खुशखबर या जिल्ह्यातील 01 लाख 74 हजार शेतकऱ्यांना 123 कोटींचा पिकविमा वाटप होणार | Crop Insurance

 Crop Insurance:नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचे आमच्या संकेत स्थळावर स्वागत आहे.

आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

खरीप हंगामात राज्यशासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा दिली होती.

त्यामुळे, जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी विमा काढला होता.

जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने २ लाख ४२ हजार १३४ शेतकऱ्यांना १६१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर केला होता.

Teacher Fight Viral video | मुख्याध्यापिका आणि शिक्षिका मध्ये डोक्याचे केस उपटेपर्यंत शाळेमध्येच झाली तुफान हाणामारी !

त्यापैकी ६७ हजार ८७४ शेतकऱ्यांना ३८ कोटी रुपये नुकसानभरपाई वितरित झाली आहे.

उर्वरित १ लाख ७४ हजार २६० शेतकऱ्यांना १२३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई जूनअखेर वितरित करण्यात येणार आहे.

खरीप हंगामात राज्य शासनाने एक रुपयात विमा काढण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार जिल्ह्यातील ७ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा काढला होता. खरीप हंगामात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या होत्या.

पंचनामा केल्यानंतर या शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार १३४ शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

नवीन काळातील नवीन महिंद्रा बोलेरो, शक्तिशाली 2.2 लिटर डिझेल प्रकार | Mahindra Bolero Neo Plus

या शेतकऱ्यांना १६१ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे, त्यापैकी आतापर्यंत ३८ कोटी रुपये वितरित झाले उर्वरित शेतकऱ्यांना १२३ कोटी रुपये महिना अखेर मिळतील.

७,३१,९५१ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढला विमा

२,४२, १३४ शेतकऱ्यांना मंजूर झाला विमा

१६१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर

६७,८७४ शेतकऱ्यांना मिळाला विमा

३८ कोटींचे झाले वितरण १,७४,२६०

शेतकऱ्यांना जून अखेर मिळणार विमा

१२३ कोटींचे होणार वितरण

तक्रारींचा तालुकास्तरावरच होणार निपटारा ■ प्रधानमंत्री पीकविमा नुकसानभरपाईसंदर्भात शेतकऱ्यांनी अधिक

माहितीसाठी पीकविमा कंपनीच्या जिल्हा, तालुकास्तरावरील तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे, त्यासाठी विमा कंपनीने तालुका निहाय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.

■ या प्रतिनिधींचे नाव आणि संपर्क क्रमांकही कृषी विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत.

फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळणार,रेशनकार्डसाठी नवीन नियम जारी | Ration Card News

Leave a Comment