एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात १५ जुलैपर्यंत करा अर्ज करता येणार ! सर्व अटी शर्ती येथे पहा | Crop Insurance 2024

Crop Insurance 2024:राज्यात खरीप हंगामb२०१६ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे.

खरीप हंगाम २०२४ करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलैला आहे.

शेतकऱ्यांनी फक्त एक रुपये प्रती अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करावयाची आहे.

या पिकांचा काढता येणार विमा

खरीप २०२४ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा अशी पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

आधार क्रमांक बंधनकारक

अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.पीक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा, पीक शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते.

खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांना वीज दरांमध्ये सवलत देणेबाबत शासन निर्णय निर्गमित GR दि.18 जुन 2024 | Farmers electricity bill discount

यासाठी आपले बैंक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे.

आधारकार्ड, ७/१२ उतारा, ८ अ, आधार संलग्न बैंक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बँक शाखेत,

तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी होता येणार आहे.

AADHAAR विम्यातील नुकसानभरपाई ही केंद्र

पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश

हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकूल

परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट,

स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

१५ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा

म्हणून या तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जुलैला आहे.

वर्धा व नागपूर जिल्ह्यांसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. नेमण्यात आली असून, १८००१०३७७१२ हा टोल फ्री क्रमांक आहे.

Free Ration Scheme | या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार उद्यापासून मोफत राशन, २२ जून पासून नवीन नियम लागू

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १५ जुलैपर्यंत सहभागी व्हावे.

यासाठी शेतकऱ्यांनी एक रुपये प्रति अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात असे आहे खरिपाचे क्षेत्र

या खरीप हंगामात तृणधान्य, कडधान्य, गळीत १ धान्य क्षेत्रात शेतकऱ्यांना वेळेवर बियाण्यांसह खतांचा पुरवठा होण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

● यात भात ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाईल. सोयाबीन पिकासाठी ९० हजार हेक्टर कापूस पिकासाठी २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे.

प्री-वेडिंग शूटसाठी गोव्याला एक रात्र दोघांचा मुक्काम पहाटे उठल्यावर मात्र ‘तू पाहिजे तशी नाहीस’ म्हणत मोडले लग्न | Pre-wedding news

Leave a Comment