लाडक्या बहिणींना 15 ते 19 ऑगस्ट पर्यंत 3000/- ₹ लाभ थेट बँक खात्यात

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही नवे बदल केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

जमीन/घर/प्लॉट, शेतीचा नकाशा download करा अगदी काही क्षणात

या योजनेच्या पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. योजना सुलभतेने राबविण्यासाठी जिल्हास्तरावर काही बदल करण्यात आले असून महिला व बालकल्याण विभागाने नव्या शासन निर्णयानुसार विधानसभा क्षेत्रनिहाय समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

या समितीत 3 अशासकीय सदस्यांचाही समावेश असेल, ज्यामुळे स्थानिक स्तरावर महिलांच्या अडचणी सोडवण्यास मदत होईल.

राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. 15 ते 19 ऑगस्टदरम्यान महिलांना या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळण्यासाठी काम सुरू आहे. नव्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठित करतील, ज्यात तीन अशासकीय सदस्य असतील, त्यापैकी एक अध्यक्ष असतील. अध्यक्ष आणि दोन सदस्यांची निवड पालकमंत्र्यांद्वारे केली जाईल. त्यामुळे योजना विधानसभा मतदारसंघात अधिक गतीमान व सुलभपणे राबवली जाईल.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment