मोफत झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करा

Free Xerox and Silai Machine Yojana 2024 : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषद तसेच समाज कल्याण विभागाच्या तर्फे शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन यावर 100% अनुदान देण्यात येत आहे. तर चालू वर्षी म्हणजेच 2024 या वर्षामध्ये या योजनेची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत व समाज कल्याण विभागातर्फे Silai Xerox Machine Scheme या योजनेसाठी 100% म्हणजेच संपूर्ण अनुदान या दोन्ही मशीन खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला शंभरच्या शंभर टक्के हे अनुदान दिले जाणार आहे 100% म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क देणे गरजेचे नाही.

या योजनेअंतर्गत जे पात्र होणारे नागरिक असतील त्यांना या शिलाई व झेरॉक्स मशीनच्या द्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद यांसारखी उपक्रम राबवत असते यामध्ये ते या मिळणाऱ्या उपकरणांचा म्हणजेच शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चा उपयोग करून ते त्यांचा स्वतःचा नवीन असा व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे हाच की बेरोजगार नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे आहे व त्यांना आर्थिक पाठबळ तसेच मदतीचा हात देणे हा आहे तर महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागातर्फे ही योजना अमलात आणली जाते.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करणाऱ्या नागरिकाचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • दिव्यांग व अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र असायला हवे.
  • अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला तसेच गावातील ग्रामसभेचा ठराव पाहिजे
  • अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच इतर लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहिजेत.

या योजनेसाठी लागणारे पात्रता व निकष

  • अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार मागासवर्गीय आणि अपंग प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. (ही योजना फक्त आणि फक्त समाजातील मागासवर्गीय घटक तसेच अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी असणार आहे.)
  • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
  • लाभार्थी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

झेरॉक्स व शिलाई मशीन योजनेसाठी असा करा अर्ज

सर्वप्रथम या योजनेसाठी लागणारा जो अर्ज आहे, तो तुम्हाला तुमच्या जवळच्या ठिकाणी असणाऱ्या समाज कल्याण विभागांमध्ये मिळेल. या ठिकाणाहून अर्ज घेऊन तुम्ही तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून व त्यासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसोबत हे अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सदरील योजना सध्या तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच समाज कल्याण ऑफिस मध्ये जेंव्हा सुरू होईल तेंव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

ही योजना फक्त समाजातील मागासवर्गीय घटक तसेच अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागामार्फत आयोजित केली जाते.

Leave a Comment