तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण! आजचा 1 तोळा सोन्याचा भाव जाणून घ्या.

GOLD RATE : बुलियन मार्केटमध्ये मागील काही आठवड्यांपासून सोन्यामध्ये मंदी दिसत आहे. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील महागाईचे आकडे आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर निर्णयापूर्वीच मंदीचे संकेत आहेत. याचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसत आहे. 12 जून रोजी MCXवर सोन्याचे दर कमी झाले होते. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 71,488 रुपये आहे.

आज चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदी 367 रुपयांनी कमी होऊन 89,030 रुपयांवर आली आहे. काल चांदीचा दर 88,663 रुपयांवर बंद झाला होता. मागील आठवड्यात चांदीचा दर 96,600 रुपयांपर्यंत पोहोचला होता, पण आता तो 90,000 रुपयांवर आहे. महागाईचे आकडे आणि व्याजदरांच्या निर्णयापूर्वी सोन्याच्या दरातही नरमाई दिसत आहे.

कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड 0.1% वाढून $2,312.70 प्रति औंसवर होते, तर फ्युचर्स मार्केटमध्ये $2,326.60 वर स्थिर होते. फेडच्या बैठकीतून व्याजदर कपातीबाबत संकेत मिळू शकतात.आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 71,440 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 65,440 रुपये आहे. सोन्याचे दर आजही कमी झाले आहेत, त्यामुळे सोनं खरेदीसाठी ही चांगली संधी आहे.

सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर – 71,440 रुपये आहे.

तसेच 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर – 65,440 रुपये आहे.

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर – 71,850 रुपये आहे.

Leave a Comment