महाराष्ट्रात आता “लाडकी बहीण योजना”महिलांना दर महिना 1500 रुपये मिळणार | Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana:लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे निकालात भाजपा, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसला दुहेरी आकडा गाठता आला नाही.काही महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे.

त्यासाठी महायुती सरकारने तयारी सुरू केली असून, मध्य प्रदेश शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.

यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृट्या स्वावलंबी करण्यासाठी ही योजना आखली जात असून पहिल्या टप्प्यात दारिद्रय रेषेखालील

९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये मिळणार आहे.

दारिद्रय रेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, विधवा परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ मिळणार आहे.

पंचायत समिती,जिल्हा परिषद,महानगरपालिका निवडणुका होणार, विधानसभा निवडणुका पूर्वीच,ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान होणार निवडणूक | Panchayat Raj Elections

सदर रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा सरकारचा मानस आहे.

आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली असून, त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे.

राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.

या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांचे एक पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले असल्याची माहिती आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment