मोठी बातमी महाराष्ट्रासह चार राज्याच्या विधानसभा निवडणुका ११ नोव्हेंबरपूर्वी होणार | Maharashtra Assembly Elections 2024

Maharashtra Assembly Elections 2024:लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक लागेल अशी अपेक्षा होती, पण ती झाली नाही.

पण आता याची जोरदार तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू असून, यासाठी तारीखही निश्चित झाल्याची माहिती मिळतेय.

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे.

विशेष म्हणजे याबरोबरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडची निवडणूकदेखील जाहीर होणार असून, ११ नोव्हेंबरपूर्वी देशातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, जम्मू- काश्मीर, हरियाणा आणि झारखंड या चार राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी एक पत्र लिहिले आहे.

या पत्रातून निवडणुकीच्या संभाव्य तारखा देण्याची मागणी केली आहे.

मतदार यादी वेळापत्रकानुसार २० ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल.

दरम्यान, २०१८ मध्ये बरखास्त झाल्यापासून जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही तर हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर आणि ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे.

आता प्रतीक्षा संपली ! करोडो सरकारी कर्मचारी आनंदित,8 व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला,ही असेल पगार रचना | 8th Pay Commission

त्यामुळे या कार्यकाळांपूर्वीच निवडणुका पूर्ण कराव्या लागतील. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमधील लोकांचा मोठा सहभाग पाहून आयोगाने जम्मू- काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्या १ जुलै २०२४ पर्यंत अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक पूर्व विशेष मोहीम २५ जूनपासून सुरू

यानंतर शुक्रवारी काढलेल्या एका निवेदनात, निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदान केंद्रांची ठिकाणे अधिक सोयीची आणि तर्कसंगत असावीत यासाठी निवडणूक पूर्व विशेष मोहीम २५ जूनपासून सुरू होईल.

आता प्रतीक्षा संपली ! करोडो सरकारी कर्मचारी आनंदित,8 व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला,ही असेल पगार रचना | 8th Pay Commission

जुलैच्या कट-ऑफ तारखेसह मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील.

२५ जुलै रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर मतदारांना ९ ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यानंतर अंतिम

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना, सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत घेण्याचे आदेश दिले होते.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, निवडणूक पॅनेल निवडणुका

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment