Maharashtra Mansoon Update: पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Maharashtra Mansoon Update : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे की मान्सूनच्या पोषक हवामानामुळे, 10 ते 14 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचणार आहे.

राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत होते. काल राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मान्सून सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, आणि सोलापूरमध्येही पोहोचला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते, 10 ते 14 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यात पोहोचेल. पुढील चार दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

10 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दोन ते तीन दिवसांत मान्सून पुणे आणि मुंबईपर्यंत पोहोचेल मान्सून लवकरच संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल. तसेच तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांतही मान्सून पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 2-3 दिवसांत मान्सून पुणे आणि मुंबईपर्यंत प्रगती करेल. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आधीच्या पावसाने काहीसा दिलासा दिला होता. मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू होता. गुरुवारी पुणे, जळगाव, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, धाराशीव आणि अकोला येथे पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर आला आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मान्सून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोहोचला आहे. तसेच, महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशाच्या काही भागांतही मान्सून प्रगती करत आहे. अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागातही मान्सून पोहोचला आहे. गुरुवारी मान्सूनची सीमा रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम आणि इस्लामपूर (प. बंगाल) येथे होती.

Leave a Comment