लाडकी बहीण योजनेत ‘हे’ बदल; जाणून घ्या नवीन नियम

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा म्हणून सरकारने सहा महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे सोपे झाले आहे. लाभार्थी महिलांची यादी १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान जाहीर करण्यात येणार आहे आणि पात्र महिलांना दोन महिन्यांसाठी त्यांच्या बँक खात्यातून थेट ३००० रुपये मिळणार आहेत.

या दिवशी खात्यात जमा होणार 3,000/- रुपये, पहा ही बातमी

माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन नियम आणि अटी:-

  • 1. लाभासाठी पोस्ट बँक खाती स्वीकारली जातील.
  • 2. महाराष्ट्राबाहेर जन्मलेल्या महिलांना स्थानिक पुरुषाशी विवाह केल्यास त्यांच्या पतीच्या कागदपत्रांचा वापर करता येईल.
  • 3. लाभार्थी महिलांची यादी दर शनिवारी ग्रामस्तरीय समितीद्वारे वाचून अद्ययावत केली जाईल.
  • 4. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ऑफलाइन अर्ज भरावा लागेल.
  • 5. तत्काळ विवाह नोंदणी शक्य नसल्यास, विवाह प्रमाणपत्रानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून मान्य केले जाईल.
  • 6. OTP चा कालावधी 10 मिनिटे असेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment