25 हजारांचा स्मार्टफोन आता खूपच कमी किमतीत; बजेट घोषणेनंतर नवे दर जाहीर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज सादर केला. यात युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

आजच्या बजेटमधील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे सोने व चांदीवरील सीमा शुल्क कमी करणे. यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाली आहे आणि मोबाईल व चार्जर स्वस्त झाले आहेत. केंद्र सरकारने मोबाईल चार्जरवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांहून कमी करून 15 टक्के केली आहे.

ज्यामुळे ग्राहकांना मोबाईल आणि चार्जर खरेदीवर 5 टक्के कमी पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे भारतीय ग्राहकांना मोबाईल खरेदीवर 5 टक्क्यांची सूट मिळणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्याचे भाव 3 ते 5 हजार रुपयांनी कमी झाले आहेत, ज्यामुळे सोने खरेदीसाठी बाजारात वाढीव मागणी होऊ शकते.

मोबाइल ही गरज बनल्याने, मोबाईल खरेदीदारांनाही दिलासा मिळाला आहे. मोबाईल आणि चार्जरच्या खरेदीवर 5 टक्के सूट मिळणार आहे.

उदा, 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी करताना आधी 20 टक्के कस्टम ड्युटीमुळे 25 हजार रुपये मोजावे लागत होते. आता, कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे हा खर्च कमी होऊन ग्राहकांना मोबाईल स्वस्तात मिळेल.

Leave a Comment