लाडकी बहीण योजनेचे तुमच्या मनातील प्रश्न आणि त्याची उत्तरे

Ladki bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत, अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

योजनेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे खाली दिली आहेत:-

प्रश्न 1: कोण पात्र आहेत?

उत्तर: 21 ते 65 वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

प्रश्न 2: अर्ज कसा करावा?

उत्तर: अर्ज करण्याची प्रक्रिया साधारणतः ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारांनी केली जाऊ शकते. अधिकृत वेबसाईटवर किंवा स्थानिक सरकारी कार्यालयांमध्ये अर्ज उपलब्ध असतील.

आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्न 3 :- एका घरातील किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार?

उत्तर – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिलांना तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो. एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रश्न 4 :- अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आधार कार्ड/ रहिवासी दाखला/ जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न दाखला / रेशन कार्ड (केसरी/पिवळा) हमीपत्र बँक पासबुक जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर पतीची कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रश्न 5:- अर्ज कुठे मिळतो? भरलेला अर्ज कुठे नेऊन द्यायचा? कोणत्या कार्यालयात द्यायचा?

उत्तर :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळतो, तर ऑफलाइन अर्ज अंगणवाडी केंद्रांवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. जिथे ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, तिथे भरलेला अर्ज अंगणवाडी सेविका किंवा सेतू सुविधा केंद्रात जमा करता येईल.

प्रश्न 6 :- अर्ज कसा करता येईल?

उत्तर :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला गूगल play Store वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा. आणि ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही नजिकचा अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकता. सदरील अर्ज भरण्यासाठी कोणताही खर्च नाही.

प्रश्न 7:- पांढरे रेशन कार्ड असल्यास कोणता उत्पन्न पुरावा लागेल?

उत्तर :- पांढरा रेशन कार्ड असल्यास उत्पन्न पुरावा म्हणून उत्पन्न दाखला काढावा लागेल. वार्षिक 2.5 लाख पर्यंतचे उत्पन्न असल्यास योजनेसाठी अर्ज करावा.

प्रश्न 8 :- महिलांना नवीन बँक खात्याची गरज आहे का?

या योजनेसाठी नवीन बँक खात्याची गरज नाही. तुमच्या जुन्या बँक खात्याला केवळ आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.

प्रश्न 9:- या योजनेत अर्ज दाखल करण्याची मुदत कधी पर्यंत आणि पहिला हफ्ता कधी मिळणार?

उत्तर :- पात्र महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी होईल. जुलैपासून योजना लागू असल्याने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केले जातील.

Leave a Comment