“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार”

Mukhymantri ladki bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेतून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे.

आरंभाला ‘लाडकी बहीण योजने’च्या पात्रतेचे निकष स्पष्ट न झाल्याने गोंधळ उडाला होता. आता निकष स्पष्ट झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना पैसे कधी मिळणार, याची उत्सुकता आहे. 1 जुलैपासून योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून, महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. मात्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरु असल्याने पैसे कधी मिळणार, हा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येथे डाऊनलोड करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची मुदत 15 जुलै होती. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी पाहून राज्य सरकारने ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. आतापर्यंत अर्ज भरलेल्या महिलांची तात्पुरती पात्र लाभार्थ्यांची यादी 16 जुलैला प्रसिद्ध केली जाईल.

अधिक माहिती येथे वाचा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची मुदत 15 जुलै होती. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी पाहून राज्य सरकारने ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. आतापर्यंत अर्ज भरलेल्या महिलांची तात्पुरती पात्र लाभार्थ्यांची यादी 16 जुलैला प्रसिद्ध केली जाईल.

1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या अंतिम लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

15 ऑगस्ट ला जमा होणार 1500/- रुपये

लाडकी बहीण योजनेची रक्कम 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना मिळेल. यानंतर 1500 रुपये रक्कम, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

Leave a Comment