मोठी बातमी अखेर नीट परीक्षा झाली रद्द विद्यार्थ्यांना मोठा दिलासा | NEET exam cancelled

NEET exam cancelled:नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए घेण्यात आलेली यूजीसी नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरकडून परीक्षे संदर्भात काही गंभीर इनपूट मिळाले होते.

त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एनटीएने १८ जून २०२४ रोजी ही परीक्षा घेतली होती.

नेट परीक्षेची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी यूजीसी नेट जून २०२४ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

Free Ration Scheme | या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार उद्यापासून मोफत राशन, २२ जून पासून नवीन नियम लागू

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

तसेच यूजीसीने जून 2024 पासून विविध 83 विषयांमध्ये पीएच.डी ला प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा घेतली जाते. मागील वर्षी ऑनलाईन परीक्षेदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन तास परीक्षा उशिरा सुरू

झाली होती. यावर्षी अशाप्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून १८ जूनला ‘नेट’ची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली. दोन शिफ्टमध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.

प्री-वेडिंग शूटसाठी गोव्याला एक रात्र दोघांचा मुक्काम पहाटे उठल्यावर मात्र ‘तू पाहिजे तशी नाहीस’ म्हणत मोडले लग्न | Pre-wedding news

फेरपरीक्षा होणार, तपशील

लवकरच कळविला जाणार यूजीसी नेट परीक्षा रद्द करून पुन्हा नवीन परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबतचा तपशील आगामी काळात जाहीर करण्यात येईल.

तसेच पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment