मोठी बातमी नीट पेपर फुटीचे कनेक्शन लातूर पर्यंत ! दोन शिक्षकांना केले अटक | Neet paper scam

Neet paper scam:वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीचे धागेदोरे आता खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत.

नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना अटक केली आहे.

संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत.

CIBIL स्कोअर 500 च्या खाली गेला आहे,कर्ज घेण्यासाठी तुम्ही ते कसे दुरुस्त करू शकता ते जाणून घ्या | CIBIL SCORE

पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत

(नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट व जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात.

त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले.

लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.

poultry farming loan | या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपयांचे कर्ज मिळेल, येथे अर्ज करा

तर, लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत

दोघेही ‘पीएचडी’धारक, खासगी क्लासेस घ्यायचे

संजय जाधव व जलील उमरखाँ पठाण हे दोघेही पीएचडीधारक आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असले तरी ते लातूरमध्ये खासगी क्लासेसही घेतात.

नीट’चा पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय महिलांसाठी नवीन “खटाखट योजना” थेट महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार | Women Khatakhat Scheme

Leave a Comment