भारतीय कायद्यात मोठा बदल खुनाचे कलम आता ३०२ नव्हे १०३ तर बलात्काराचे ३७६ ऐवजी कलम ६४ | New Indian Act Sec

New Indian Act Sec:ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा १ – जुलैपासून इतिहासजमा होणार असून या दिवसापासून नवीन कायदे लागू होणार आहेत.

यामुळे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये लावण्यात येणारे कलमही बदलणार आहे.

यासोबतच दोषारोपपत्र, शिक्षेची तरतूद यातही बदल होणार आहे. सरकारने सध्याच्या कायद्यांमधील काही कलम रद्द केले असून, नव्या कायद्यात काही गुन्ह्यांचाही समावेश केला आहे.

२३ फेब्रुवारी २०२३ रोजी जारी अधिसूचनेनंतर डिसेंबरमध्ये नवीन कायद्यांना मंजुरी मिळाली.

आनंदाची बातमी सोन्याचे भाव घसरले, खरेदी करण्यापूर्वी आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे नवीनतम भाव तपासा | Gold Price Today

त्यामुळे भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा १ जुलैपासून बदलून त्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे लागू होतील

सध्याचे गुन्हे चालू कायद्यानुसारच

१ जुलैपासून नवीन कायदे लागू

होणार आहे; मात्र ३० जूनपर्यंत जे गुन्हे घडतील त्यांचा तपास १ जुलैनंतरही नवीन कायदे, कलमांनुसार न होता, सध्या लागू असलेल्या कायदे, कलमांनुसारच होणार आहेत.

तपासातील अडचणी दूर होऊन गुन्हेगारांनाही जरब

देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला. तरीदेखील देशात १५० वर्षे जुने ब्रिटिशकालीन कायदे आहे. त्यात काळानुरूप गुन्ह्यांचे स्वरूपही बदलले आहे.

मोठी बातमी तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार सविस्तर माहिती येथे पहा | Secondary Education Course

त्यामुळे जुन्या कायद्यांमधील अनेक तरतुदीनुसार पोलिसांना तपासात अडचणी येतात.

त्यामुळे तपास यंत्रणेला गती येऊन शिक्षेचेही प्रमाण वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे गुन्हेगारांना जरब बसून गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment