PM kisan 17th installment : पी.एम. किसान चा 17 वा हप्ता 18 जून ला जमा होणार, पहा सविस्तर बातमी

PM kisan 17th installment : पी.एम. किसान सन्मान निधी योजना ही देशातील गरीब शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य देणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत लाभार्थ्यांना 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात. परंतु, अनेक बोगस लाभार्थीही या योजनेचा लाभ घेत आहेत.

अधिकृत संकेतस्थळ पहा

आता ज्या शेतकऱ्यांनी E- kyc केलेली आहे, अश्या शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता एप्रिल 2024 ते जुलै 2024 या कालावधीसाठी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे 18 जून 2024 रोजी हा हप्ता वितरीत केला जाणार आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट 2000 रुपये जमा केले जातील.

अधिकृत संकेतस्थळ पहा

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार, सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलं) दरवर्षी 6000 रुपये दिले जातात, जे तीन 2000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यात जमा होतात. 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत, राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत 15 हप्त्यांमध्ये एकूण 27,638 कोटी रुपये मिळाले आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment