Police Bharti Hall ticket 2024 | पोलीस भरती ग्राउंड परीक्षा दिनांक 19 जून पासून सुरू होणार सविस्तर माहिती पहा !

Police Bharti Hall ticket 2024:सन २०२२ व २०२३ ची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया खालील टप्प्यांप्रमाणे राबविण्यात येणार आहे:

१) दिनांक ०३/०६/२०२४ नंतर ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाऊनलोड करुन घेण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

२) सेवाप्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल.

त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यानुसार घटक प्रमुखांनी शारिरीक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी.

३) सेवाप्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल.

त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यानुसार घटक प्रमुखांनी शारिरीक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी.

४) सेवाप्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई बॅण्डस्मन या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल.

त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यानुसार घटक प्रमुखांनी शारिरीक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी.

५) सेवाप्रवेश नियमानुसार राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम १०० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल.

त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यानुसार घटक प्रमुखांनी शारिरीक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी.

६) सेवाप्रवेश नियमानुसार कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल.

त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व कारागृह विभागाकरीता लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.

त्यानुसार घटक प्रमुखांनी शारिरीक चाचणी विहित कालावधीत पूर्ण करावी.

७) महाआयटी विभागाकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे आवेदन अर्ज तपासून घटक प्रमुखांनी खात्री करावी.

प्राप्त झालेल्या एकुण आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.

Maratha reservation news | मोठी बातमी मराठा आरक्षण सगेसोयरे अधिसूचना अंतिम होणार ! मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेणार

त्याबाबतचे मैदानी चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करुन तसे या कार्यालयास व महाआयटी विभागास पाठविण्यात यवे.

प्रत्येक दिवशी किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे व सदरची शारीरिक चाचणी कोठे घेण्यात येणार आहे

त्या ठिकाणाचा (मैदानाचा) सविस्तर उमेदवारांना कळेल असा पत्ता याबाबतची माहिती महाआयटी विभागास raunak.saraf@mahait.org या संकेत स्थळावर कळवावी.

त्याप्रमाणे महाआयटी विभागास उमेदवारांकरीता शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने पुरविणे वेळीच शक्य होईल.

जाड्या आंटीने केला जोरदार कॉक डान्स, फनी ॲक्टिंग पाहून यूजर्स जोरजोरात हसायला लागले | Viral Video

महाआयटी विभागास वेळोवेळी माहिती पुरविण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी.

त्या अधिकाऱ्याचे पद, मोबाईल क्रमांक, दुरध्वनी क्रमांक व इ-मेल कळविण्यात यावे.

८) भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक १९.०६.२०२४ पासून सुरु करावयाची असल्याने महाआयटी विभागास दिनांक ०७.०६.२०२४ रोजी १६.०० वाजेपावेतो शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालील नमुद विवरणपत्रात माहिती सादर करावी.

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment