अतिमुसळधार पावसामुळे आज ‘या’ जिल्ह्यांच्या शाळांना सुट्टी जाहीर

Rain Alert : हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून पुणे, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने 9 जुलै (मंगळवारी ) रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना, तर काही जिल्ह्यांत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि काही जिल्ह्यांमध्ये शाळांसह महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत आज प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील धोका लक्षात घेऊन नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी आहे, तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात दुपारपासून पावसामुळे उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात शाळा आणि बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, आणि भोर तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना उद्या सुट्टी असेल. रायगड जिल्ह्यात अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. रत्नागिरीमध्येही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

अधिक माहिती येथे वाचा

Leave a Comment