सरकार आता या राशन कार्डधारकांच्या घरावर लावणार पाट्या | Ration Card News

Ration Card News:सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रेशन दुकानांमधून स्वस्त दरात लाभार्थीना अन्न-धान्याचा पुरवठा केला जातो.

मात्र गरिबांसाठीचे धान्य अनेकवेळा ज्यांना गरज नाही असेही नागरिक धान्य उचलतात.

त्यामुळे ज्यांना धान्य मिळते, अशा अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील नागरिकांच्या घरासमोर आता पाट्या लावण्यात येणार आहेत.

यामुळे खरे लाभार्थी समोर येणार असून, आता गरजूंनाच रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे.

IMD Rain Big Alert | मोठी बातमी ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

रेशनच्या स्वस्त धान्यापासून खरे लाभार्थी वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे.

यामुळे गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार असून, या प्रकाराला आळा बसणार आहे.

गरीब आणि वंचित घटकातील कोणताही नागरिक उपाशी राहू नये

यासाठी पुरवठा विभागाकडून रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थीना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते.

मात्र अनेकवेळा ज्यांना गरज नाही, असेही नागरिक धान्याची उचल करतात.

काहीवेळा ते अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत खोटेनाटे कागदपत्रं जुळवून लाभ घेतात.आता मात्र अशा नागरिकांची मोठी गोची होणार आहे.

शासनस्तरावर अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांच्या

घरावर पाट्या लावण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्यांना धान्याची गरज नाही त्यांनी आपला धान्यावरील हक्क सोडून गरिबांना मदत करणे गरजेचे आहे.

मात्र लोभापोटी अनेक नागरिक गरीब नागरिकांसह पुरवठा विभाग, शासनाचीही दिशाभूल करीत धान्याची उचल करीत आहेत.

अशा लोकांना चाप लावण्यासाठी आता अंत्योदय आणि दारिद्र रेषेखालील लोकांच्या घरावर पाट्या लावण्यात येणार आहेत.

घरावर लागणार पाट्या

अंत्योदय योजनेतील आणि दारि- द्रयरेषेखालील लाभार्थीच्या घरांवर पाट्या लावण्यात येणार आहेत.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील १३ ही तहसील- दारांना सुचना देण्यात आल्या आहेत. लवकरच जिल्ह्यात अशा पाट्या लागणार आहेत.

आता गरिबांचे धान्य लुटणाऱ्यांची होणार गोची

आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही काही लाभार्थीची नावे अंत्योदय आणि दारिद्र्यरेषेखालील यादीत समाविष्ट आहेत. या योजनेमुळे गरिबांचे धान्य लुटणाऱ्यांची मोठी गोची होणार आहे.

Free Driving Licence | ड्रायव्हिंग लायसन्स काढा मोफत,डायरेक्ट मिळणार घरपोच

अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील

कार्डधारकांच्या घरावर अंत्योदय, दारिद्रयरेषेखालील कार्डधारकांच्या घरावर पाट्या लावण्याविषयी शासनाचे आदेश

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
     येथे क्लिक करा

Leave a Comment