आजपासून रेशन दुकानात गहू ऐवजी ‘ही’ वस्तू मिळणार

Ration Card update : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांतून जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिकांवर गहू आणि तांदूळ दिला जातो. मागील वर्षभरापासून या शिधापत्रिकांवरील गव्हाचे प्रमाण कमी करून तांदळाचे प्रमाण वाढवले आहे.

त्यामुळे अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकांवर प्रत्येक कार्डधारकाला १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ, तर प्राधान्यक्रम योजनेतील शिधापत्रिकांवर माणशी १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ दिला जातो. गव्हाचे प्रमाण आधीच कमी असल्याने शिधापत्रिकाधारकांना बाजारातून महाग गहू विकत घ्यावा लागत आहे. आता गव्हाचे वितरण पूर्णपणे बंद होत असल्याने या शिधापत्रिकाधारकांना अडचण येणार आहे.

केंद्र सरकारने ज्वारी खरेदी केली आहे. ऑगस्टपासून स्वस्त धान्य दुकानांतून ज्वारीचे वितरण सुरू होईल. त्यामुळे आता शिधापत्रिकाधारकांना पोळीऐवजी भाकरी खायला मिळणार आहे.

पुढील दोन-तीन महिने स्वस्त धान्य दुकानांत गव्हाऐवजी ज्वारीच मिळेल. वाशिम जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार हे स्पष्ट झाले आहे.

ज्वारीचे वितरणही गव्हाएवढेच?

शासनाने भरडधान्य खरेदी अंतर्गत ज्वारी खरेदी करून ती स्वस्त धान्य दुकानांतून वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गव्हाच्या तुलनेत ज्वारीचे प्रमाण वाढवलेले नाही. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेंतर्गत जेवढा गहू वितरित केला जातो, तेवढेच ज्वारीचेही वितरण केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment