रेल्वेत मेगाभरती: 8 हजार रिक्त जागांसाठी अर्ज `या` तारखेपासून

RRB JE Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. भारतीय रेल्वेने ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board) विविध झोनमध्ये या पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चला, पाहूयात या भरतीसंबंधित संपूर्ण माहिती. Indian railway jobs

भरतीचा तपशील (RRB JE Notification 2024)

रेल्वे भर्ती बोर्डाने एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये रोजगार सूचना प्रकाशित केली आहे. (CEN) क्रमांक 03/2024 नुसार, एकूण 7951 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:-

  • 1. कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
  • 2. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (Depot Material Superintendent)
  • 3. केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट (Chemical and Metallurgical Assistant)
  • 4. केमिकल पर्यवेक्षक (संशोधन पर्यवेक्षक) आणि इतर पदे

रेल्वे भरती बोर्ड ज्युनिअर इंजिनिअर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू होईल. उमेदवार 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतील.

परीक्षा फी

रेल्वे भरती बोर्ड ज्युनिअर इंजिनिअर भरती 2024 साठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. एससी, एसटी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी हे शुल्क 250 रुपये आहे. निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील CBT मध्ये उमेदवारांचं नाव असेल तर बँक फी कमी केल्यानंतर परीक्षा शुल्क परत करण्यात येईल.

या भरतीसाठी उमेदवारांना रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दिल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशन पेजवर अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया सुरू होताच तपशीलवार भरती अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करावा.

pdf जाहिरात पहा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment