दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार, शासन निर्णय

10th-12th Board Exam Fee Refund: 2023-24 : महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शासनाने तालुक्यासह काही मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. या अनुषंगाने दुष्काळी भागात सवलती देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येत आहे.

दुष्काळी भागातील इयत्तादहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी लातूर विभागीय परीक्षा मंडळाला प्रस्ताव दाखल केला आहे. तो मंजूर होताच जिल्ह्यातील ३८ हजार ५८७ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १ कोटी ६५ लाख २९ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत.

10 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ४२० तर 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ४४० रुपये

दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयानुसार ५०० ते ६०० रुपये परीक्षा शुल्क होता. दुष्काळी परिस्थितीमुळे परीक्षा शुल्क परत देण्यात येत आहेत. मात्र, मार्क मेमो व इतर कागदपत्रापोटी काही रक्कम कपात करून ४२० रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

बारावी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना विषयानुसार ७०० पेक्षा अधिक फिस आहे. माहिती तंत्रज्ञान विषय असल्यास २०० रुपये फिस वाढते. भरलेल्या फिसपैकी बारावीच्या विद्यार्थ्यांना ४४० रुपये फिस परत मिळणार आहेत. उर्वरित रक्कम प्रशासकीय शुल्क २०, गुणपत्रिका २०, प्रात्यक्षिक १५, एमसीव्हीसी प्रात्यक्षिक परीक्षा ३०, माहिती तंत्रज्ञान विषयाचे २०० यासह इतर कागदपत्रांसाठी शुल्क कपात केला आहे.

शासनाने तालुक्यासह काही मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. या अनुषंगाने दुष्काळी भागात सवलती देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment