8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेवर महत्वाची बातमी, फॉर्म्युला तयार, लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळणार खुशखबर !

8th Pay Commission : आताच मागील महिन्यात केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. आता सध्या त्यांचा महागाई भत्ता दर हा 50% वर पोहोचला आहे.

महागाई भत्ता दर हा 50% झाल्यावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनश्रेणी आणि भत्त्यांमध्ये बदल केला जातो असा नियम आहे. अशा परिस्थितीत सरकार 8 व्या वेतन आयोगाची समिती जाहीर करणार की अन्य काही नियमांद्वारे वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करणार याबाबत सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चाहूल लागली आहे.

सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या पगारात सुधारणा करण्याचे सूत्र जाहीर करावे, या मागणीसाठी सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

दर 10 वर्षांनी वेतन आयोग

दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करावा असा नियम आहे. आतापर्यंत सरकारने 7 वेतन आयोग स्थापन केले आहेत. सहावा वेतन आयोग 2006 पासून या वर्षी तर सातवा वेतन आयोग 2016 या वर्षी स्थापन करण्यात आला होता म्हणून आता आठवा वेतन आयोग 2026 पासून लागू होण्याची आशा कर्मचारी आणि पेन्शन धारकांना लागली आहे.

वरील ठिकाणी दिलेल्या माहिती वरुन तुम्हाला लक्षात आले असेलच की आता पर्यंत दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला गेला आहे. 1 जानेवारी 2006 पासून सहावा वेतन आयोग स्थापन केला आहे, 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे, आता 7 वा वेतन आयोग स्थापन करून 10 वर्षे झाली आहेत, अशा परिस्थितीत 8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येईल अशी आशा आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कर्मचाऱ्यांना आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा आहे. एम्प्लॉइज वर्कर्सचे अध्यक्ष व्हीसी यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सद्य परिस्थितीत आठवा वेतन आयोग विलंब न लावता स्थापन करावा, अशी मागणी केली आहे. यासोबतच BIRTSA ने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही विलंब न करता आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची विनंती केली आहे.

संसदेच्या मागील अधिवेशनादरम्यान खासदार रामनाथ ठाकूर यांनी अर्थमंत्र्यांना आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत प्रश्न विचारला होता. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींचा सरकारने विचार का केला नाही. असा सवाल रामनाथ ठाकूर यांनी केला होता. सातव्या वेतन आयोगाच्या पॅरा 1.22 मध्ये असे म्हटले आहे की पगार आणि पेन्शनचा आढावा घेणे आवश्यक आहे, 10 वर्षे प्रतीक्षा न करता पगार आणि पेन्शन वाढवले पाहिजे.

आठवा वेतन आयोग स्थापन केल्यानंतर पगार आणि पेन्शनवर होणारा खर्च सरकारला पेलणार नाही का, अशी सत्ताधाऱ्यांना भीती वाटते का, असा सवाल रामनाथ ठाकूर यांनी केला. एकीकडे मोदींच्या काळात देशाची आर्थिक व्यवस्था चांगली झाल्याचे सरकार म्हणते, मग केंद्र सरकार वेतन आयोग स्थापन करण्यात दिरंगाई का करत आहे. असा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारकडे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. आठवा वेतन आयोग आणण्याचा सरकारचा विचार नाही असे वित्त राज्यमंत्री चौधरी म्हणाले आहेत.

Leave a Comment