मोठी बातमी : तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार

नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरिकांकडून 3 जूनपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गाची पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे. हा आराखडा ‘एससीईआरटी’ ने खुला केला असून, त्यावर 3 जूनपर्यंत सूचनामागविल्या आहेत.

एनईपी-२०२०’ नुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला.

अंगणवाडीच्या पुस्तकांसाठी प्रतीक्षाएनईपी नुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरी हा शिक्षणाचा पायाभूत स्तर मानला गेला आहे. त्यात अंगणवाडीला बालवाटिका संबोधण्यात आले आहे. आता बालवाटिका एक, बालवाटिका दोन, बालवाटिका तीन तसेच इयत्ता पहिली च इयत्ता दुसरी या पाच वर्गासाठीचा अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने तयार केला आहे.

महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला. तो अंतिम झाला आहे. आता परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. त्यावर 3 जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.

बालभारती चे संचालक कृष्णकुमार पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी साहित्यनिर्मितीचे काम आमच्याकडे असते. अंगणवाडी पाठ्यपुस्तक छपाईबाबत आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही पाठ्यपुस्तके याच वर्षी पुरविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

Leave a Comment