बालकांना प्रत्येक महिन्याला 2250/- रुपये बाल संगोपन भत्ता सुरू, असा भरा फॉर्म

Bal sangopan Yojana, Maharashtra : सर्वच पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. आपल्या मुलांनी भविष्यात चांगले शिक्षण घेऊन प्रगती करावी अशी त्यांची इच्छा असते. पण अशी अनेक मुलं आहेत ज्यांना आई-वडील नाहीत किंवा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना नीट अभ्यास करता येत नाही. अशा मुलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे.

बाल संगोपन योजना महाराष्ट्र – बालसंगोपन योजना काय आहे? बाल संगोपन योजनेचे उद्दिष्ट काय आहे? बाल संगोपन योजने करिता ऑनलाइन अर्ज कसा करावा? याबाबत सविस्तर माहिती पुढे पहा

बाल संगोपन योजनेचा लाभ 0 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांना मिळण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ हा अनाथ, बेघर, कोरोना किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आर्थिक संकटात सापडलेली कुटुंबे आणि गरीब कुटुंबातील मुलांनाही या योजनेच्या कक्षेत आणण्यात आले आहे. म्हणजे अशी 0 ते 18 वयोगटातील मुले ज्यांचे पालन पोषण करण्यासाठी कोणी नाही किंवा जे मुले बेघर आहेत.

राज्यामध्ये बालकांच्या संगोपनासाठी बाल संगोपन ही सरकारी योजना राबविली जाते, ही योजना आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना म्हणून ओळखण्यात येते, या योजनेमध्ये दरमहा कुटुंबाला 2,500 रुपये इतके अनुदान बालकांच्या संगोपनासाठी देण्यात येते.

बाल संगोपन योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून बालकांच्या संगोपनासाठी पालकास प्राप्त होणाऱ्या परिपोषण अनुदानात वाढ करण्यात आली आहे, या अगोदर प्रतिमाह 1100/- रुपये इतका निधी देण्यात येत होता परंतु दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतीबालक 2250/- रुपये इतका भत्ता करण्यात आला आहे.

योजनेच्या लाभासाठी लागणारी कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • अर्जदाराचे वय प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे बँक खाते तपशील
 • अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे पालक मरण पावले असल्यास, त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र
 • अर्जदाराचा मोबाईल नंबर
 • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

बाल संगोपन योजना करिता अर्ज

 • सर्वप्रथम महिला व बालविकास विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक https://womenchild.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करून थेट जाऊ शकता.
 • पुढे पेज उघडल्यानंतर तुम्हाला बाल संगोपन योजनेशी संबंधित अर्ज मिळेल.
 • आता तुम्हाला अर्जदाराचे नाव, पालक/पालकांचे नाव, आधार कार्ड क्रमांक इत्यादी सारख्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल.
 • अर्जात मागितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • आता पुढे Submit या पर्यायावर क्लिक करा.
 • बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा अर्ज पूर्ण होईल.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन अर्ज नमुना फॉर्म येथे डाऊनलोड करा

वरील ठिकाणी दिलेला अर्ज फॉर्म भरून योग्य ती कागदपत्रे जोडवित आणि तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयात सदरील फॉर्म जमा करावा.

बाल सरंक्षण समिती द्वारे तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल.

Leave a Comment