मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास वर भरती, पगार – 16,600/- ते 52,400/- रुपये

Bombay High court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) खडपीठा मध्ये सफाई कामगार पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहीत नमुन्यात [जाहिरातीसोबत परिशिष्ट- ‘अ’ प्रमाणे] आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या (Self Attested) छायांकित प्रतीसह दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत दिलेल्या पत्यावर पाठवावेत.

पदाचे नाव – सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता – 4 थी पास

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय 5 वर्षे सूट

डिमांड ड्राफ्ट – Registrar High Court Bench at Aurangabad यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेतून रूपये २००/- चा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल. सदरील शुल्क ना-परतावा राहील.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता

“प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024 पर्यंत

मूळ जाहिरातयेथे जाहीरात पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज नमुना येथे क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराने संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेला तपशील योग्य आहे हे सुनिश्चित करुन घेऊन अर्ज सादर करावा.

उमेदवाराने एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल त्यासंबंधी उच्च न्यायालय प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही तक्रार/दावा ऐकला जाणार नाही तथा विचारात घेतला जाणार नाही.

विवाहित महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता (उदा. ४थी, ७वी, १०वी, आणि १२वी इत्यादी) तत्सम अर्हता धारण करताना त्यांचे जे नाव होते त्याच नावाने अर्ज करणे अनिवार्य आहे.

सफाई कामगार पदासाठी इयत्ता चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता उदा. १० वी/१२ वी/पदवी प्राप्त असेल व त्याच्याकडे / तिच्याकडे इयत्ता चौधी ये गुणपत्रक नसेल तर त्याने तिने अर्ज भरताना इयत्ता चौथी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची (उदा. एकूण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी.

राज्य शासनाच्या इतर विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सध्याच्या नियोक्त्याकडून ना हरकत प्रमाणपत्र येणे आवश्यक आहे. उच्य न्यायालय प्रशासनाकडून निर्देशित केल्यावर ते सादर करावे लागेल.

उमेदवारांनी त्यांचा वैध ई-मेल आय डी तसेच मोबाईल नंबर अर्जात नमूद कराना ज्या वर आवश्यकता भासल्यास पत्रव्यवहार तसेच संपर्क केला जाईल.

सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा

Leave a Comment