या शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचार मिळणेबाबत परिपत्रक

Circular cashless treatment : राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचार मिळणेबाबत दिनांक 02 मे 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

अधिक माहिती येथे वाचा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी/कर्मचारी हे कर्तव्यावर असतांना आजारी पडल्यास त्यांची सुश्रुशा किंवा उपचार चांगल्या रुग्णालयात करण्यासाठी व्यवस्था/Tie-ups/Cashless medical Treatment सुविधा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 निवडणूक कर्तव्यावर असतांना आजारी पडलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करण्याबाबत सदरील परिपत्रक आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम दिनांक 16/03/2024 ला घोषित झाला असून आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान सुध्दा झालेले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत बऱ्याच जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी आजारी पडल्याच्या किंवा मृत झाल्याच्या घटना निदर्शनात येत आहेत.

यास्तव निवडणूक कर्तव्यार्थ असताना आजारी पडलेले अधिकारी/कर्मचारी, सीएपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व त्यांच्यावरील उपचाराबाबत सोबतच्या प्रपत्रात माहिती तात्काळ या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी, याबाबत विनंती केली आहे.

Leave a Comment