महागाई भत्ता 4% वाढला, किती येणार वाढून पगार आणि फरक पहा?

DA Hike Calculator : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार 4% वाढला असून, एकूण महागाई भत्ता 46% वरून 50% इतका करण्यात आला आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी 2024 मध्ये 4% वाढ केली होती, त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील 4% वाढ करण्यात आली आहे, त्या बाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.

आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे; परंतु एकूण पगार किती वाढणार आणि फरक किती मिळणार ते आपण पुढे सहिस्तर पाहू.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता हा जानेवारी 2024 पासून लागू केलेला आहे; परंतु प्रशासकीय कारणास्तव सदरील महागाई भत्ता आणि फरक ( जानेवारी ते जून) अशी 6 महिन्याची थकबाकी माहे जुलै च्या पगारात मिळणार आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किती मिळणार DA (महागाई भत्ता) फरक

उदाहरण पाहू

  1. समजा तुमचे मूळ वेतन 29,200/- रू. आहे.
  2. सध्या 46% नुसार मिळणारा महागाई भत्ता – 13432/- रुपये.
  3. 50% नुसार मिळणारा महागाई भत्ता – 14600/- रुपये
  4. 4% महागाई भत्ता वाढी नंतर मिळणारा फरक = 14600-13432 = 1168
  5. 6 महिन्याची एकूण थकबाकी 1168×6 = 7008/- रुपये
  6. म्हणजेच माहे जुलै मध्ये एकूण 8176/- रुपये पगार वाढवून येणार.

Leave a Comment