तुमच्या मोबाईल वरून घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करा, पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Driving Licence Online Apply : तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर आता RTO ऑफिस ला जाण्याची गरज नाही. कारण आता ऑनलाईन घरी बसून तुमच्या मोबाईल वरून घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्ही अर्ज करू शकता.

ड्रायव्हिंग लायसन्स हे प्रत्येक वयाचे 18 वर्षे पूर्ण झालेल्या चालकाला आवश्यक आहे. तसेच ते एक पुरावा म्हणून तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी दस्तऐवज म्हणून उपयोगी येते; परंतु ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ची प्रोसेस पाहून खूप जणांना अडथळे येतात, पण आता ऑनलाईन मोबाईल द्वारे तुम्ही पुढील स्टेप द्वारे ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता.

ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला चलन भरावे लागेल. सध्या कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला अजून तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स मिळाला नसेल आणि तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर पुढे पाहा संपूर्ण माहिती..

ड्रायव्हिंग लायसन्स करिता लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो, 10वी/12वी ची गुणपत्रिका आणि मोबाईल नंबर

ड्रायव्हिंग लायसन्स करिता अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज (How To Apply online driving licence)

सर्वप्रथम तुम्हाला परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आता परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.

या पेजवर तुम्हाला Driving Learner Licent या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटचे एक नवीन पृष्ठ तुमच्यासमोर उघडेल.

या पृष्ठावर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि पुढे जावे लागेल. आता तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.

येथे तुम्हाला Apply for Learner Licence आणि Driving Licence चा पर्याय मिळेल.

जर तुमच्याकडे अगोदर Learner Licence असेल, तर Driving Licence चा पर्याय निवडा.

Learning Licence करिता पुढील प्रमाणे ऑनलाईन Apply करा..

शिकाऊ परवान्याचा पर्याय निवडल्यानंतर, तुमच्यासमोर अर्जाचा फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक इत्यादी विचारलेली माहिती द्यावी लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून फी भरा किंवा अर्ज फी जमा करा.

पेमेंट स्टेटस पडताळल्यानंतर पावती प्रिंट करा. शेवटी लर्निंग लायसन्ससाठी स्लॉट बुक करा.

शिकाऊ परवाना मंजूर झाल्यानंतर 30 दिवसांनी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता..

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला Driving Licence चा पर्याय निवडावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय निवडल्यानंतर, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.

या अर्जामध्ये विचारलेली माहिती प्रविष्ट करा. आता आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी एक स्लॉट बुक करा. यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचा पर्याय उघडेल. दिलेल्या पेमेंट पद्धतीद्वारे अर्ज फी जमा करा.

पेमेंट स्टेटस पडताळल्यानंतर पावती प्रिंट करा. अश्या प्रकारे तुम्ही वरील दिलेली प्रक्रिया स्टेप बाय स्टेप करून घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून Driving Licence साठी अर्ज करू शकता.

Leave a Comment