शासकीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुक ड्युटी भत्ता देण्याबाबत, शासन निर्णय

Employees Election Duty Allowance : भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याचे दर शासनाच्या दिनांक ०८/०४/२००९ च्या संदर्भाधिन शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहे.

भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्र क्रमांक ४६४/आयएनएसटी-पे/२०१४/ईपीएस, दिनांक २८.२.२०१४ अन्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याचे किमान दर सुधारीत करण्याच्या सूचना दिल्या असून सुधारीत दर ही कळविले आहेत.

आयोगाच्या सदर पत्रातील सूचनांना अनुसरून राज्यातील लोकसभा / विधानसभा निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना सुधारीत दराने निवडणूक भत्ता देण्याचे शासनाच्या विचाराधिन होते. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक / पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याऱ्यांना / कर्मचाऱ्यांना देण्यात यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबतचा संदर्भाधिन शासन निर्णय अधिक्रमित करुन भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्रमांक ४६४/आयएनएसटी-पे/२०१४/ईपीएस, दिनांक २८.२.२०१४ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरुन महाराष्ट्र राज्यातील लोकसभा/विधानसभा निवडणुकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

दिनांक 18/04/2024 रोजीचा सुधारित शासन निर्णय पहा

शासन निर्णय

Leave a Comment