राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन निधी मंजूर करणे संदर्भात दि. 16/04/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

Employees Salary : सन 2024-25 या आर्थिक वर्षा करिता महिला व बालविकास विभाग अंतर्गत जे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आहेत त्यांचे वेतन अदा करणे संदर्भात दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.

सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक-एक्स-1 मुख्य लेखाशिर्ष 2236- पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांचे मार्च 2024 व एप्रिल 2024 या महिन्याच्या वेतनाकरिता सदरील शासन निर्णयातील विवरणपत्रातील रकाना क्रमांक- 2 मधील लेखाशीर्ष/उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक-5 प्रमाणे एकुण रुपये 9000.00 लक्ष (रुपये नव्वद कोटी फक्त)) इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय तुम्ही पुढे पाहू शकता

शासन निर्णय

Leave a Comment