EPF बॅलेन्स तपासायचे चार पर्याय, जाणुन घ्या

EPFO Balance Check : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेधारकांना त्यांच्या खात्यातील जमा रक्कम तपासायची असेल तर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. जमा रक्कम तपासणे हे फार फार सोपे आहे.

मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्याची माहिती मिळवू शकता. पीएफ बॅलेन्स एकूण चार पद्धतींनी तपासता येते.

EPF बॅलेन्स असा तपासा, जाणून घ्या चार सोपे पर्याय :-

  1. UMANG ॲप वापरून: UMANG ॲप डाउनलोड करून आपले UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. यानंतर, ‘EPFO’ पर्याय निवडून ‘Employee Centric Services’ वर क्लिक करा. येथे तुम्हाला EPF बॅलेन्स दिसेल.
  2. EPFO च्या वेबसाइटवरून : EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि ‘Our Services’ अंतर्गत ‘For Employees’ पर्याय निवडा. ‘Member Passbook’ वर क्लिक करा आणि आपले UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. येथे तुम्हाला तुमचा EPF बॅलेन्स दिसेल.
  1. SMS द्वारे : तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 या नंबरवर ‘EPFOHO UAN ENG’ असा एसएमएस पाठवा. यानंतर तुम्हाला तुमच्या EPF बॅलेन्सची माहिती मिळेल.
  2. मिस कॉल देऊन : तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 या नंबरवर मिस कॉल द्या. काही क्षणातच तुम्हाला तुमच्या EPF बॅलेन्सची माहिती एसएमएस द्वारे मिळेल.

Leave a Comment