सोन्याचा दर 61,180/- हजारांवर करत होता ट्रेंड!, सध्या काय स्थिती? पहा ताजे दर

GOLD SILVER PRICE TODAY : ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली परवडली असती; कारण मार्च 2023 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,180/- हजारांवर होता काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, सध्या सोन्याचा भाव 72,000/- हजारांवर ट्रेंड करत आहे.

सराफा बाजारात सध्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घट झाली आहे. 23 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1289 रुपयांनी कमी होऊन 72791 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

तसेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण होऊन ती 3476 रुपयांनी कमी होऊन 89410 रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी, बुधवारी सोने 74080 रुपये आणि चांदी 92886 रुपयांवर बंद झाली होती.

19 एप्रिल 2024 रोजी सोने 73596 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होते. 22 मे रोजी चांदी 93094 रुपये प्रति किलोचा उच्चांकी स्तरावर होती.

यंदा दुष्काळी परिस्थिती असली तरीही, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सराफा बाजारात सोन्याचा दर 72,000/- रुपये असल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्या अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली भविष्यासाठी कधीही चांगली राहणार आहे.

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. मात्र, जून महिन्यात पेरणीची लगबग सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात किमती कमी होऊ शकतात, असे काही व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या लग्नसराई थंडावल्यामुळे अनेकांनी सोने खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. तरीही, सोन्याच्या किमतींमध्ये घट झालेली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम आपल्या बाजारातही दिसत असून, पुढील महिन्यात सोन्याचा भाव 72 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

लग्नसराईमुळे अनेकांनी सोने खरेदीला चांगला प्रतिसाद दिला होता. मार्चमध्ये, लग्नसराईमुळे सोन्याचा भाव 66,270 रुपयांवर गेला होता. आता, 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment