शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत शासन निर्णय

Leave Encashment New GR : अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 27/02/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम १६ मधील खालीलप्रमाणे पोटनियम क्र. १८ (अ) व २९ येथे नमूद कर्मचा-यांनाच रजा रोखीकरण लागू राहील.

१८ (अ) जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाव्यतिरिक्त (परंतु उप-मुख्याध्यापकासहित) एखादा स्थायी कर्मचारी मोठया सुट्यांना हक्कदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठया सुट्यांचा किंवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्याऐवढी अर्जित रजा अनुज्ञेय राहील”.

“(२९) ज्याला पोट-नियम (१८) च्या तरतूदी लागू आहेत असा कर्मचारी धरुन नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी, सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती ३०० दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढया रजेच्या बाबतीतील रजावेतनाइतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असेल.”

शासन निर्णय

Leave a Comment