कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता (DA) वाढीनंतर या भत्त्यात वाढ, इतका वाढणार पगार

Government Employees : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता (DA) वाढीनंतर या भत्त्यात वाढ, इतका वाढणार पगार

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% इतका करण्यात आला आहे. सदरील महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता वाढून जवळपास तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. यासोबतच आणखी एका भत्त्याची आपोआप वाढ होणार आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, महागाई भत्ता वाढल्यावर घरभाडे भत्त्यात देखील वाढ होते. जेव्हा महागाई भत्ता 25% झाला होता, तेव्हा घरभाडे भत्ता 8% दराने देण्यात आला होता. आता, महागाई भत्ता 50% च्या वर गेल्यावर, घरभाडे भत्त्यातही सुधारणा करण्यात येणार आहे, म्हणजेच घरभाडे भत्ता पुन्हा वाढवला जाणार आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, जेव्हा महागाई भत्ता 25% झाला होता, तेव्हा घरभाडे भत्त्यात सुधारणा करण्यात आली होती. आता महागाई भत्ता 25% पेक्षा जास्त झाल्यावर, X श्रेणीतील क्षेत्रात 50 लाख आणि अधिक लोकसंख्येच्या कर्मचाऱ्यांना HRA 24% ऐवजी 30% दराने मिळेल. Y श्रेणीतील, 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील कर्मचाऱ्यांना HRA 16% ऐवजी 20% दराने मिळेल. Z श्रेणीतील, 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना HRA 9% ऐवजी 10% दराने मिळेल.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणजेच एकूणच x,y,z लोकसंख्या असलेल्या शहरातील कर्मचाऱ्यांना त्या शहराच्या लोकसंख्येनुसार HRA मध्ये वाढ मिळणार आहे.

Leave a Comment