सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! या दोन भत्त्यात आणखी वाढ होणार..

Government employees News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट या दोन भत्त्यात आणखी वाढ, वेतनात होणार सुधारणा या विषयी सविस्तर माहिती पुढे पहा..

मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ झाल्याने अनेक गणिते बदलले आहेत. आता पहिला महागाई भत्ता शून्यापासून सुरू होणार असून दुसरा महागाई भत्ता 50% पर्यंत नेण्यात आला आहे.

परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे की जेव्हा महागाई भत्ता शून्यापासून सुरू होईल तेंव्हा घरभाडे भत्त्याचे काय होणार जाणून घेऊया सविस्तर

महागाई भत्त्यात होणार सुधारणा

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के करण्यात आला होता, त्यानंतर पुढील सुधारणेवर महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल अशी चर्चा आहे परंतु याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही; परंतु नियमांच्या अहवालात महागाई भत्ता 50 टक्के झाल्यावर तो परत शून्यावर आणला जाईल असे नमूद आहे.

महागाई भत्ता 0% होऊन HRA मध्ये सुधारणा

माहे जुलै 2024 मध्ये महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आशा वाटत आहे; पण महागाई भत्ता शून्य झाल्यास दोन गोष्टीवर परिणाम होणार आहे; परंतु कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये देखील परत एकदा सुधारणा करण्यात येणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शून्य ते 24 टक्के – 24, 16, 8 – दराने घरभाडे दिले जाते. त्याचवेळी, महागाई भत्ता 25 टक्क्यांपर्यंत पोहोचताच HRA 27, 18, 9 टक्के करण्यात आला होता तर महागाई भत्ता ५० टक्केपर्यंत पोहोचताच HRA 30, 20 आणि 10 टक्के होईल.

अशा परिस्थितीत, महागाई भत्ता शून्यावर आणला गेला तर HRA ची कमाल मर्यादा देखील सुधारित करून 24% पर्यंत कमी केली जाईल. सध्या X शहरांच्या श्रेणीमध्ये 30%, Y श्रेणीमध्ये 20% एचआरए आणि Z शहरांच्या श्रेणीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 10% घरभाडे भत्त्याचा लाभ दिला जातो.

2016 मध्ये सातव्या वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारने महागाई भत्त्याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन बदलले आणि डीए दर शून्यावर आला. त्यानंतर HRA देखील महागाई भत्त्याशी जोडण्यात आला ज्यामध्ये दोनदा सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रथम जेव्हा डीए 25 टक्के असेल आणि दुसऱ्यांदा जेव्हा महागाई भत्ता 50% होईल. तर महागाई भत्ता 25 टक्क्यांपर्यंत पोहोचेपर्यंत HRA चे किमान दर 24, 16, 8% असतील. दरम्यान, महागाई भत्ता शून्य होणार की नाही याबाबत अद्यापही साशंकता असून अधिकृत याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

त्याचवेळी, कामगार ब्युरोने देखील कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही, त्यामुळे 50 टक्केनंतर महागाई भत्त्यात बदल होणार नाही, याबाबत विश्वासाने सांगितले जाऊ शकत नाही. मात्र, महागाई भत्ता शून्यावर आला तर जुलैपासून लागू होणाऱ्या डीए दरांमध्ये दिसून येईल, ज्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणे अपेक्षित आहे.

अश्या प्रकारे DA शून्यापासून सुरू होणार असून त्याचप्रमाणे HRA मध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे.

Leave a Comment