लाडका भाऊ योजना; पात्रता आणि, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

Ladka Bhau Yojana Documents : राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध घोषणा केल्या, ज्यामध्ये युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. अधिवेशनात राज्य सरकारने विविध योजनांची घोषणा केली. महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी, आरक्षित प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण, आणि युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार, पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 8 हजार, आणि पदवीधरांना 10 हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी असा करा अर्ज

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे आणि त्यांनी बारावी, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • योजनेचा लाभ शिक्षण चालू असणाऱ्यांना मिळणार नाही.
  • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याची आधार नोंदणी असावी आणि बँक खाते आधार संलग्न असावे.
  • इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योग किंवा आस्थापना विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देतील.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • चालक परवाना
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • बँक खाते पासबुक
  • ई-मेल आयडी

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तांकडून लवकरच ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था तयार केली जाईल. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

Leave a Comment