खुशखबर !! गॅसच्या दरात झाली घसरण, पहा नवीन दर

LPG PRICE : भारतात गॅस धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या गस चे दर वाढत चालले असून सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. परंतु आता लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही आठवड्यांचा अवकाश असताना केंद्र सरकारने शुक्रवारी स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) दरात घसघशीत 100 रुपयांची कपात केली आहे. 7 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला दिन 2024 च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आणि एलपीजी सिलेंडरची किंमत कमी केली आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरवर दिले जाणारे 300 रुपयांचे अनुदान 31 मार्च 2025 पर्यंत वाढवले ​​आहे.

या योजनेचा फायदा 10 कोटींहून अधिक महिलांना होणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले होते. अनुदानित सिलिंडरच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 10 सिलिंडरवर अनुदान मिळत होते, आता ते 12 करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Leave a Comment