पोलिस भरतीसाठी एका पेक्षा जास्त अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी परिपत्रक जारी, maha police bharti

Maha police bharti 2024 : महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने पोलीस कॉन्स्टेबल, SRPF कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांसाठी 17471 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले होते.

सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती- 2023 करीता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो. अशी तरतूद करण्यात आली आहे. परंतु काही उमेदवारांनी एका पर्यायाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे.

सदरील परिपत्रका द्वारे सुचित करण्यात येते की, उमेदवार ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जावून फक्त एकाच घटकांसाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्या बाबतचे हमीपत्र स्व-हस्तक्षरात भरुन देण्यात यावे.

सदरची कार्यवाही दिनांक 8 मे 2024 ते 17 मे 2024 या कालावधीत संबंधित पोलिस अधीक्षक कार्यालयात जावून पूर्ण करावी व 17 मे 2024 पर्यंत उमेदवाराने सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर त्यांचे सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येतील असे कळवले आहे.

Leave a Comment