दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल या तारखेला लागणार – शिक्षणमंत्र्यांनी दिली अपडेट

Maharashtra SSC Board Result 2024 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Low CIBIL Score Loan – कमी सीबिल स्कोअर वर 50,000/- रुपयांपर्यंत कर्ज मिळवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला. या निकालात कोकण विभागाने सर्वाधिक गुण मिळवले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी दहावीच्या निकालाबद्दलही माहिती दिली की, हा निकाल 27 मे पर्यंत जाहीर केला जाईल.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दहावीचा निकाल 27 मेपर्यंत लागेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया 24 मेपासून सुरू होणार आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होईल आणि इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रक्रिया असेल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस आधी जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर होणार होता, पण राज्यात पाचव्या टप्प्याचे मतदान बाकी असल्यामुळे निकाल मतदान झाल्यानंतर जाहीर केला गेला. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचे आहे, ते बसू शकतात, असेही केसरकर यांनी सांगितले.

Leave a Comment