RBI च्या नविन नियमांमुळे सोने तारण (Gold Loan) कर्जदारांच्या अडचणी वाढणार

RBI GOLD LOAN RULE : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता गोल्ड लोनबाबत कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेषत: नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांवर (NBFCs) अधिक लक्ष ठेवले जात आहे. NBFCs ने सोने कर्ज देताना RBI चे सर्व नियम पाळावेत अशी RBI ची अपेक्षा आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, मार्च मध्ये RBI ने IIFL फायनान्सला नवीन गोल्ड लोन देण्यास बंदी घातली होती. RBI च्या कठोर नियमांमुळे सामान्य नागरिकांना गोल्ड लोन मिळण्यात अडचण येऊ शकते आणि याचा NBFC च्या व्यवसायावरही वाईट परिणाम होऊ शकतो.

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहीर, येथे पहा सविस्तर

20000/- रूपये पेक्षा जास्त रक्कम बाबत

एनबीएफसी कंपन्या सोने कर्ज देताना नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला वारंवार मिळत होत्या. आरबीआयच्या नियमानुसार, तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या एकूण किमतीच्या फक्त 75 टक्के रक्कमच कर्ज म्हणून दिली जाऊ शकते.मात्र, अनेक एनबीएफसी कंपन्या ग्राहकांना या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज देत आहेत. तसेच, कर्जाची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा न करता रोख स्वरूपात दिली जात आहे. आता आरबीआयने एनबीएफसींना निर्देश दिले आहेत की, ते फक्त 20,000 रुपयांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम कर्जदाराच्या बँक खात्यातच जमा करतील.

रिझर्व्ह बँकेच्या या कठोर नियमांचा नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या गोल्ड लोन व्यवसायावर नकारात्मक परिणाम होईल. एनबीएफसी त्वरित रोख कर्ज देत असल्यामुळे गोल्ड लोनचा व्यवसाय वाढत होता, पण या बंदीमुळे एनबीएफसीचे गोल्ड लोन आता आकर्षक राहणार नाही.तसेच, एनबीएफसी बँकांपेक्षा सोन्यावर जास्त कर्ज देत होत्या. आरबीआयच्या कठोर नियमांनुसार, आता ते सोन्याच्या किमतीच्या केवळ 75 टक्केच कर्ज देऊ शकणार आहेत. यामुळे सुवर्ण कर्ज व्यवसायावरही परिणाम होईल.

Leave a Comment