ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, 1 जून पासून लागू होणार नवे नियम

Driving Licence New Rule : वाहन चालविण्यासाठीआवश्यक असणारे लायसन्स काढण्यासाठी RTO मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु आता RTO मध्ये न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम 1 जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काहीमहत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

सात बाऱ्यावर नाव चुकले का? असे करा दुरुस्त

खासगी संस्थांच्या प्रशिक्षकासाठी काय असतील नवे नियम ?

 • किमान 1 एकर भूखंड आवश्यक (चारचाकीसाठी 2 एकर)ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा
 • प्रशिक्षक हा किमान 12 वी उत्तीर्ण व 5 वर्षांचा अनुभव असावा.
 • हलक्या वाहनांसाठी 4 आठवड्यात 29 तासांचे प्रशिक्षण ( 8 तास थेअरी 21 तास प्रात्यक्षिक)
 • अवजड वाहनांसाठी 6 आठवड्यात 39 तासांचे प्रशिक्षण (8 तास थेअरी 31 तास प्रात्यक्षिक)

लायसन्स Renew करण्यासाठी येथे ऑनलाईन अर्ज करा

आता लागणार फक्त इतके शुल्क

 • लर्निंग लायसन्स : 150 रुपये
 • लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क : 50 रुपये
 • ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क : 300
 • ड्रायव्हिंग लायसन्स : 200 रुपये
 • लायसन्स नूतनीकरण : 200 रुपये
 • दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स : 500 रुपये

ड्रायव्हिंग लायसन्स करिता ऑनलाईन अर्ज येथे करा

आणखी कोणते नवे नियम लागू होणार?

 • जुने वाहने बाद : प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहे.
 • कठोर दंड : वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25 हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्यास २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही. तसेच वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल.
 • सुलभ अर्ज प्रक्रिया : लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत.
 • कागदपत्रांसाठी https://parivahan.gov.in/. या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment