सातबाऱ्यावर नाव चुकले का? असे करा दुरुस्त

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम 1966 अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके असतात. त्यात कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत 21 वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात.

jio चा 5G smartphone 1699/- रुपयांमध्ये अनेक फिचर्स सह लॉन्च

यापैकी ‘गावचा नमुना नं. 7’ आणि ‘गावचा नमुना नं. 12’ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्याला सातबारा उतारा म्हणतात. प्रत्येक जमीन धारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे या उताऱ्यावरून कळू शकते.

महावितरण मध्ये 12 वी पास उमेदवारांसाठी 5,347 जागांसाठी भरती

सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. 7/12 हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो. 7/12 ची नवीन पुस्तके साधारणतः हा 10 वर्षांनी लिहिली जातात. 7/12 पीक पाहणी नोंद दरवर्षी केली जाते.

आनंदाची बातमी रेशन कार्ड धारकांना सरकार देणार 1000 रुपये

राज्यात सुमारे अडीच कोटींहून अधिक सातबारा उतारे तयार आहेत. त्यात संगणकावर टायपिंग करताना किंवा पूर्वी हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्यातील चुका झाल्यास त्या दुरुस्त करता येणे शक्य आहे. चुका झाले किंवा दुरुस्ती राहून गेले सातबारा उतारे दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत.

कोठे अर्ज कराल?

सातबारावर जर चुकीचे नाव आले असेल तर संबंधित तहसीलदाराकडे चूक दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसहित अर्ज करणे अपेक्षित आहे. म्हणजेच खरे नाव काय आहे, याचा पुरावा, तसेच ज्या सातबाऱ्यावर दुरुस्ती करावयाची आहे तो मूळ सातबारा तहसीलदारांनी काही अन्य कागदपत्रे मागितली असतील तर त्या सर्व कागदपत्रांसहित अर्ज करावा.

तहसीलदार शहानिशा करून सातबारावरील नावात दुरुस्ती करतात- अशा प्रकारच्या दुरुस्तीसाठी वकिलांची गरज भासत नाही. तरीही महसूल विभाग किंवा अन्य कुठलेही सरकारी कार्यालयात दप्तर दिरंगाईत वेळ लागण्याची शक्यता असल्याने अनेकदा ही कामे वकिलांकडे सोपविली जातात.

Leave a Comment