One Vehicle One Fastag : देशात लागू झाला ‘एक वाहन, एक फास्टॅग’ नियम, जाणून घ्या डिटेल्स

One Vehicle One Fastag : सरकारी मालकीच्या नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) चा ‘एक वाहन, एक फास्टॅग’ हा नियम सोमवारपासून लागू झाला आहे. काय आहे उपक्रम जाणून घ्या details

सरकारी मालकीच्या नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) चा ‘एक वाहन, एक फास्टॅग’ हा नियम सोमवारपासून लागू झाला आहे. अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर करणे किंवा एका विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडणे याला परावृत्त करणे हा यामागचा उद्देश आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन NHAI ने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रमाचे पालन करण्याची अंतिम मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवली होती. “एकाहून अधिक फास्टॅग काम करणार नाहीत… ज्या लोकांकडे एका वाहनासाठी अनेक फास्टॅग आहेत ते (1 एप्रिल) ते सर्व वापरू शकणार नाहीत.

इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर अखंड हालचाली देण्यासाठी, NHAI ने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम सुरू केला आहे. ज्याचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर करण्यास परावृत्त करणे आणि एका विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडणे प्रतिबंधित करणे हा आहे.

गेल्या महिन्यात, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ग्राहकांना तसेच पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) च्या व्यापाऱ्यांना 15 मार्चपर्यंत त्यांची खाती इतर बँकांमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला होता. FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे चालवली जाते.

Leave a Comment