रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर !! रेशन दुकानात या दोन वस्तूंचे मोफत वाटप सुरू..

Ration Card Update : रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर आहे, कारण त्यांना आता रेशन दुकानात दोन नवीन वस्तुंचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे.

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली असून, या योजनेनुसार वर्षातून दोन कापडी पिशव्या मिळणार आहेत. दहा किलो वजनाइतके साहित्य ठेवता येईल, अशी विणलेली कापडी पिशवी मोफत मिळणार आहे. सहा महिन्यांच्या अंतराने एक पिशवी ग्राहकांना लवकरच देण्यात येणार आहे.

नवीन वस्त्रोद्योग धोरण

राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे. हे धोरण २०२८ पर्यंत लागू राहणार आहे. या धोरणांतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थीना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता, याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 355 रुपयांप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहे. आता याच धोरणांतर्गत लाभार्थ्यांना कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत.

हे वाचा 👉 लग्नानंतर मुलीचे मतदान ओळखपत्र चा पत्ता असा बदला, मिनिटात करा प्रोसेस

अद्याप साड्या उपलब्ध झालेल्या नसल्यामुळे; साड्या आणि पिशव्या लवकरच उपलब्ध होतील; त्या आल्यानंतर शासन निर्णयानुसार वाटप करण्यात येणार आहेत. रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थीना मोफत साडी देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. वर्षातून दोन कापडी पिशव्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागातून साडीचे वाटप सुरू झाले आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबत पुढच्या टप्यात कापडी पिशव्या वाटण्याचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या सूचनांनुसार वर्षातून दोन पिशव्या देणार आहे. या पिशव्यांवर धान्य वाटप योजनेची माहिती असणार आहे.

हे पहा 👉 👆 Jio Bharat 5G Smartphone : फक्त 1,299/- रुपयात खरेदी करा

Leave a Comment