तुम्ही SBI कडून 20 वर्षांसाठी 30 लाख रुपये गृहकर्ज (Home Loan) घेतले तर EMI आणि व्याज किती जाईल ? जाणून घ्या

SBI Home Loan Calculator : प्रत्येकाला वाटत असते की आपले स्वतःचे एखादे घर असावे: परंतु शहरात घर बांधणे म्हणजे 30 ते 40 लाख रुपये रक्कम असणे गरजेचे आहे. एवढी मोठी रक्कम सामान्य व्यक्तीला जमवणे शक्य नसते; परंतु तुम्ही कोणतीही काळजी करू नका कारण तुम्ही SBI कडून गृहकर्ज (Home Loan) घेऊ शकता, त्यासंबंधी तुम्हाला किती EMI आणि व्याज द्यावे लागेल ते पहा पुढे सविस्तर..

ICICI Bank personal Loan, 10 मिनिटात 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तात्काळ मिळवा

तूम्ही ही ड्रीम होम साठी जर गृहकर्जाची योजना आखत असाल तर व्याजदरांबाबत सविस्तर तपासणी करणे तुमच्या हिताचे आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI बद्दल बोलायचे तर, गृहकर्जासाठी तिचा प्रारंभिक व्याज दर 8.15 टक्के आहे. तुम्हाला 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर तुमचा मासिक ईएमआय किती असेल आणि कर्जाच्या कालावधीत तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल हे येथील गणनेतून समजून घ्या.

personal Loan साठी CIBIL Score किती असावा, जाणुन घ्या सविस्तर

SBI Home Loan EMI Calculation

SBI च्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 750 किंवा त्याहून अधिक सिव्हिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना ते 8.15 टक्के प्रारंभिक दराने गृहकर्ज देत आहे. आता आपण असे गृहीत धरू की तुम्हाला 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे आहे, कर्जाचे व्याजदर संपूर्ण कार्यकाळात सरासरी समान राहिल्यास, तर सध्याच्या प्रारंभिक व्याजदरावर तुमचा EMI आणि व्याज किती असेल?

Google Pay वरून तात्काळ मिळवा 60,000/- रुपये कर्ज

कर्जाची रक्कम 30 लाख रुपये असल्यास आणि कर्जाचा कालावधी हा 20 वर्षे असेल आणि व्याज दर हा वार्षिक 8.15% तर तुम्हाला दरमहिना 25374/- रुपये इतका हप्ता EMI द्यावा लागेल तसेच 3,089,756/- रुपये इतके व्याज द्यावे लागेल आणि तुम्हाला एकूण 6,089,756/- रुपये रक्कम बँकेला 20 वर्षात जमा होईल.

तथापि, हे जाणून घ्या की तुम्ही तुमच्या CIBIL स्कोअर आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर आधारित गृहकर्जाच्या व्याजदरांची सौदेबाजी करू शकता. फ्लोटिंग रेटवरील व्याजदर सध्याच्या दरापेक्षा कमी असू शकतात.

SBI सारख्या शेड्युल्ड बँकांकडून गृहकर्ज थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडलेले असतात. रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर व्यावसायिक बँका RBI कडून कर्ज घेतात. ऑक्टोबर 2019 पासून, रिझर्व्ह बँकेने बँकांना फ्लोटिंग रेटवर दिलेली वैयक्तिक कर्जे, वाहन कर्ज आणि गृहकर्ज इत्यादींना रेपो दराशी जोडणे बंधनकारक केले आहे. बहुतेक बँका रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) वर गृहकर्ज देत आहेत. त्याला एक्सटर्नल बेंचमार्क रेट (EBR) असेही म्हणतात.

Leave a Comment