राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी अग्रीम मध्ये भरीव वाढ दि. 01 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

State employees Housing advance Increase GR : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता घरबांधणी अग्रीम मध्ये भरीव वाढ करणेबाबत दि. 01 मार्च 2024 रोजी वित्त विभाग कडून महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वित्त विभाग, शासन निर्णय दि.२.२.२०२१ अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी अग्रीमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. घरांच्या किंमतीत विशेषतः शहरी भागात सातत्याने होणारी वाढ विचारात घेऊन घरबांधणी अग्रीमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सबब, दि.२.२.२०२१ च्या शासन निर्णयात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

घर बांधणी अग्रीम कमाल मर्यादा शासन निर्णय

घरबांधणी विषयक विविध प्रयोजनांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रीम मंजूर करण्याकरीता सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतन विचारात घेण्यात यावे. अशा वेतनावर आधारीत घरबांधणी अग्रीम मंजूरीकरीता वित्त विभागाच्या क्र. घभाम-१०१५/प्र.क्र.१९/ सेवा-५, दि.१६ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या (तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणांनुसार) “एक्स”, “वाय” व त्या व्यतिरिक्त उर्वरीत वर्गीकरणातील शहरांमध्ये घर/ सदनिका/जमीन खरेदीसाठी सुधारीत कमाल मर्यादा पुढीलप्रमाणे असतील.

सविस्तर शासन निर्णय पहा

Leave a Comment