या कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देणेबाबत महत्वाचे परिपत्रक जारी

State Employees Increament : राज्यातील ग्राम विकास विभागाने दिनांक 14 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सदरील परिपत्रकाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व) (पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, अहमदनगर, कोल्हापूर व सोलापूर वगळून) यांना प्रतिद्वारे कळवण्यात आले आहे.

26 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार पदवीधर वेतनश्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरुन, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापकअथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळल्यानंतर, काही जिल्हा परिषदा वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१, नियम ११ (१) (अ) नुसार पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे, महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही माननीय विधानसभा/विधान परिषद यांच्या पत्रान्वये शासनाच्या निदर्शनास आल्याने याबाबत सर्व समावेशक सुचना देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता.

पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वेतन निश्चित करताना, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये मागविलेली आपल्या कार्यालयाची माहिती अद्याप अप्राप्त आहे. तरी सदरहू माहिती संदर्भाधीन पत्रात नमूद केलेल्या विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शासनास सादर करावी, ही विनंती सदरील परिपत्रक अन्वये करण्यात आली आहे.

Leave a Comment